अमरावती जिल्हयाची संक्षिप्त माहिती

महाराष्ट्र राज्याचे अमरावती हा एक जिल्हा विभागीय जिल्हा म्हणून ओळखला जातो. अमरावती जिल्हयातील पार्श्वभूमी पाहिली असता अमरावती हा जिल्हा बेरार प्रांतातील एक जिल्हा म्हणून ओळखला जातो. अमरावती विभागात एकूण 5 जिल्हयाचा समावेश होतो. त्यामध्ये अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम व अकोला हे जिल्हे आहेत. अमरावती जिल्हयामध्ये एकूण 14 तालूक्याचा समावेश आहे.

अमरावती जिल्हा महाराष्ट्राच्या उत्तरेला मध्यप्रदेशाच्या सिमालगत असून जिल्हयाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगे बाबा व डॉ.पंजाबराव देशमुख या सारख्या संत महापुरुषांचा वारसा लाभलेला आहे. तसेच जिल्हयाला पुर्णा, तापी, वर्धा हया प्रमुख नदया आहेत. जिल्हयामधून राज्य महामार्ग क्र. 6 गेलेला आहे. तसेच समृध्दी महामार्गाचे काम सुरु आहे. वाहतूक भूमार्गाने होते. अमरावतीचे हवामान उष्ण व कोरडे आहे

सन 1971 मध्ये घोषित केलेल्या देशातील 15 व्याघ्र प्रकल्पातील एक मेळघाट व्याघ्र प्रकल्प असून 100 पेक्षा अधिक वाघांचे वास्तव्य आहे. तसेच जिल्हयामध्ये चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण आहे. तसेच पर्यटन स्थळ घेाषित करण्यात आलेले आहे. अंबादेवी मंदीर एकवीरा मंदीर, बांबु उद्यान, श्री.क्षेत्र कोडेंश्वर, छत्रीतलाव,शालेय तसेच क्रिडा संबधीत जागतीक स्तरावरील हिट करणे बर्लीन ऑल्मपीक 1936 वेळेस महत्व लाभलेली शैक्षणिक व क्रिडा प्रकारचे प्रशिक्षण दिल्या जाणारी हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ अमरावती येथे स्थित आहे.


ऑनलाईन योजना